मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू ( Kamshet News) असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत काल 20 ऑगस्ट २०२५ रोजी कामशेत रेल्वे स्टेशन इंद्रायणी नदीच्या पाण्यात एक माणूस अडकला होता. तेथील नागरिकांनी कार्य तत्परता दाखवून त्या माणसाचे प्राण वाचविले.
कामशेत रेल्वे स्टेशन येथे इंद्रायणी नदीच्या पाण्यात ( Kamshet News) एक माणूस अडकला होता. काल रात्री साडेआठ वाजता राजेश ढगे यांना “वाचवा वाचवा” असा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले की पंपाच्या मागे इंद्रायणी नदीमध्ये पाण्यात एक माणूस कठड्याला धरून उभा आहे तो जोराने आवाज देत आहे.
Alandi : इंद्रायणी नदीपात्रात वाहत जाणाऱ्या युवकास आपत्ती व्यवस्थापनाकडून जीवदान
लगेच त्यांनी कामशेत पोलीस स्टेशन व अभिमन्यू शिंदे यांना फोन केला त्या क्षणी तेथे नागरिकाला वाचवण्यासाठी तत्पर रोशन शिंदे, बंटी शिंनगारे, संदेश पायगुडे, इतर नागरिकांनी येऊन त्याला पाण्यातून बाहेर काढले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निंबाळकर साहेब व पोलीस बांधावांचे मोठे ( Kamshet News) सहकार्य मिळाले.