situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Favorite Sher : पुष्प 5वे : मनाला आवडलेले शेर.. चाहे सोने की फ्रेम लगावो..आईना झूठ बोलता ही …..नही – नूर उर्फ कृष्णबिहारी

Updated On:
Favorite Sher

Team My pune city – पुष्प 5वे : मनाला आवडलेले शेर.. चाहे सोने की फ्रेम लगावो..आईना झूठ बोलता ही …..नही – नूर उर्फ( Favorite Sher) कृष्णबिहारी.

रसिक मित्र हो आदाब, अचानक सुचलेल्या या सदराचा ( Favorite Sher) आजचा हा पाचवा भाग, आपण देत असलेल्या सुंदर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.गजलेच्या गारुडाबद्दल बोलावे तितके कमीच, कधी काळी या गजलेवर जास्त अंमल उर्दूचा होता. मलाही उर्दू भाषा, तिचा अदब, तिचा लहेजा, तिची मान (आदर )देण्याची पद्धत खूप आवडते. पण तरीही उर्दू गजल सर्वसामान्यांना सहजासहजी उमजत नाही. काही हिंदी शायरांनी हिंदीत उत्तम गजला लिहीत त्या लोकप्रिय करत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या.

Alandi : इंद्रायणी नदीपात्रात वाहत जाणाऱ्या युवकास आपत्ती व्यवस्थापना कडून जीवदान

खूप मोठमोठी नावे आहेत यात, जावेद अख्तर, गुलजार, फिराक गोरखपुरी, निदा फाजली खूप मोठमोठी नावे आहेत. यातलेच एक मशहूर नाव आहे ते म्हणजे नूर उर्फ कृष्णबिहारीजी. ज्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1925 साली लखनऊ येथे झाला. त्यांच्या सुंदर गजला आणि त्यासारखेच सादरीकरण यामुळे त्यांनी हिंदी साहित्यिक मंडळीत एक मानाचे स्थान मिळवले होते. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गजल आहे,

जिंदगी से बडी सजा ही नहीं
और क्या जुर्मं हैं पता ही नही
….


यातला प्रत्येक शेर एकापेक्षा एक आहे. खरं तर गजलेचे तंत्रच अफलातून आहे. एक शेर म्हणजे एक कविताच जणू, त्यामुळे कुठलाही एक शेर वाचला की एक सुंदर( Favorite Sher) साक्षात्कार होतो. मला सोशल मीडियावर ही गजल वाचण्यास, पाहण्यासाठी मिळाली. ती ऐकताच मी तिच्या प्रेमात पडलो.यातलाच हा एक सुंदर शेर आहे, खरं तर जुनी म्हणच आहे की ही एक, आरसा कधीच खोटे बोलत नाही. त्याच अर्थाला नूर साहेबांनी सुंदर शब्दात गोंदुन एक चिरकाल, चिरंजीव शेर जगाला दिलाय हा.

Lonvala Crime News : लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या सरीत चोरट्यांचा डाव; दोन फ्लॅटमध्ये 5 लाख 87 हजारांचा ऐवज लंपास

तुम्ही कसे आहात हे जगाला तुम्ही काहीही सांगू शकाला पण त्याचवेळी आरशात म्हणजेच तुमच्या अंतर्मनात डोकावून तुम्ही पाहिले की ते तुम्हाला केवळ आणि केवळ सत्यच सांगेल, नाही का? हेच वैश्विक सत्य या महान शायराने साध्या सरळ शब्दात ( Favorite Sher) मांडताना तुम्ही सत्या पासून कितीही दूर पळण्याचा वा ते लपवण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य कधीच लपत नाही असे ठामपणे सांगितले आहे. म्हणूनच असे शेर कानावर पडले की तोंडातून आपसूक वाहवाच बाहेर पडते.

सच घटे या बढे तो सच ना रहे
झूट की कोई इंतहा ही नही


हा शेर सुद्धा असाच खूप म्हणजे खूपच अर्थपूर्ण आहे. खऱ्याचे मोल कमी जास्त केले तर ते खरे राहत नाही, मात्र खोट्याच्या बाबतीत मात्र खोटे जितके जास्त तितके ते जास्त वाटते. खरे तर या गजलेतला प्रत्येक शेर मला प्रचंड आवडतो, पण मी माझ्या मनाला आवर घालत आहे.

आपल्या रचनेद्वारे अमर असणारा हा महान शायर देहरूपाने या जगातून 30 मे 2003 साली निघून गेला, या सदराच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण ( Favorite Sher) आदरांजली.


विवेक कुलकर्णी.

Follow Us On