मावळ ऑनलाईन – मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लोणावळा ( Lonavala News )वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीसमोर सोमवारी दुपारच्या सुमारास अक्षरशः राडाच उडाला. पुण्यातील निगडी परिसरातून वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या महिलांच्या एका ग्रुपमध्ये वाद निर्माण होऊन त्यांनी भर रस्त्यावर एकमेकींना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये सोबत असलेल्या पुरुषांनाही या महिलांनी चोप दिला. या प्रकारामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाली होती.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सदर महिला नशेत असल्याचे दिसून( Lonavala News ) आले. सुरुवातीला किरकोळ वादातून सुरू झालेला वाद शिवीगाळीपर्यंत गेला आणि काही वेळातच तो हाणामारीत परिवर्तीत झाला. “पोलीस आमच्या खिशात आहेत” असे वक्तव्य करत या महिला मोठमोठ्याने आरडाओरडा करत होत्या. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या महिलांनी त्याकडे कानाडोळा केला.
Rashi Bhavishya 21 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
घटनास्थळी पुरुष पोलिसांना हस्तक्षेप करण्यात अडचण आल्याने ( Lonavala News )अखेर लोणावळा शहर पोलीस ठाण्यातून महिला पोलीस बोलावण्यात आल्या. महिला पोलिसांनी तत्काळ सर्व महिलांना ताब्यात घेतले. यावेळी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
या प्रकारामुळे लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पर्यटक आणि स्थानिक वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोणावळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी ( Lonavala News ) सुरू आहे.