मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – १३, शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – २१.०८.२०२५. (Rashi Bhavishya 21 August 2025)
शुभाशुभ विचार – त्रयोदशी वर्ज्य.
आज विशेष – शिवरात्री, गुरुपुष्यामृत.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – पुष्य. चंद्र राशी – कर्क.
मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 21 August 2025
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकड्या चर्चेतून वाद निर्माण होतील. अति हुशार व्यक्तींच्या सहवासात कमीच बोलणे हिताचे राहील.
वृषभ (शुभ रंग- आकाशी)
खर्च कितीही वाढता असला तरीही आर्थिक चणचण भासणार नाही. काही नवीन व्यावसायिक संधी चालून येतील. आज राजकीय नेते प्रभावी वक्तव्ये करतील.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात आज नवे हितसंबंध तयार होतील. उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील. एखादी हरवलेली वस्तू आज पुन्हा शोधल्यास सापडू शकेल.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
काही थकीत बिले भरावी लागतील. बेरोजगारांना घरापासून दूरवर नोकरीच्या संधी येतील. आज तुम्ही भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी योग्य गुंतवणूक कराल.
Somatane Accident : काँक्रीट मिक्सरची धडक बसून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
सिंह ( शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 21 August 2025
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आपला मोठेपणा जपण्यासाठी तुम्ही काही खर्च कराल.
कन्या (शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची तुमची आज तयारी असेल. ध्येयप्राप्तीच्या दिशेने तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. आज तुमचे स्पर्धकही तुमचा सेवा करतील.
तूळ (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदार व्यक्ती नव्या नोकरीच्या शोधात असतील. ज्येष्ठ मंडळींची आज अध्यात्माकडे रुची वाढेल. तरुणांनी अति आक्रमकता टाळणे गरजेचे आहे.
वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)
कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. सासुरवाडी कडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. आज पत्नीचे ऐका.
Hinjewadi Crime News : आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 21 August 2025
भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. नोकरीतही वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करतील. आशादायी दिवस.
मकर (शुभ रंग- जांभळा)
तुमचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या काही घटना घडतील. आरोग्याच्या काही तक्रारी डोके वर काढतील. जोडीदाराकडे आपले मन मोकळे करावेसे वाटेल.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा खर्च कराल. प्रिय व्यक्तीला आज तुम्ही एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.
मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कंटाळवाणा दिवस. नोकरदारांना कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज गृह उद्योगातून चांगली कमाई करू शकतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424