situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavla Rain : लोणावळ्यात 24 तासात 432 मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत 

Published On:
Lonavala Rain

मावळ ऑनलाईन – यावर्षी लोणावळा शहरावर पावसाने ( Lonavla Rain) अक्षरशः थैमान घातले असून मंगळवारी( दि.19)  अवघ्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 432 मिमी (17.01 इंच) पावसाची नोंद झाली. आजअखेरपर्यंत एकूण 4810 मिमी (189.37 इंच) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 4514 मिमी (177.72 इंच) पाऊस झाला होता. म्हणजेच यावर्षी तब्बल 296 मिमी अधिक पाऊस झाला आहे.


Rescue operation : नदीकाठावर पाण्यात अडकलेल्या महिलेला वाचविण्यासाठी मध्यरात्री ‘रेस्क्यू ऑपरेशन’

 संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यांमुळे रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक परिसर जलमय झाले आहेत. वलवण, नांगरगाव, बापदेव रोड, नारायणी धामकडे जाणारा रस्ता, भद्रीविशाल सोसायटी, बस स्थानक रस्ता, शहाणी रोड, भांगरवाडी, रायवूड परिसर, बाजारपेठ व नवीन पोलीस स्टेशनसमोरील रस्ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत. वाहनचालकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा( Lonavla Rain) लागत आहे.

Alandi : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ; नदीपात्रातील पाणी शनी मंदिरापर्यंत

दरम्यान, इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून सर्व नालेही तुडुंब भरले आहेत. नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली ( Lonavla Rain) आहे.

नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, महत्वाचे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. तसेच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे व झाडांच्या खाली उभे राहू नये. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी तत्पर असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

धरणांमध्ये अजूनही साठवण क्षमता उपलब्ध असल्याने पूरस्थितीचा धोका नसला तरी नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले ( Lonavla Rain) आहे.

Follow Us On