मावळ ऑनलाईन –बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी( Dehu Road Crime News) एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी दुपारी देहुरोड येथील एम बी कॅम्पमधील पाण्याच्या टाकीखाली करण्यात आली.
अरुण धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत पतंगे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.( Dehu Road Crime News) अरुण धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत पतंगे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Alandi : अजा एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण शर्मा हा पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्याच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक राऊंड जप्त करण्यात आले आहे. देहुरोड पोलीस ( Dehu Road Crime News) तपास करत आहेत.