मावळ ऑनलाईन – श्री विठ्ठल परिवार मावळचे अध्यक्ष,कीर्तनकार हभप गणेश महाराज जांभळे यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन शाखा ( Gurumauli Award ) कोल्हापूर पुणे यांच्या वतीने अध्यात्मिक व वारकरी संप्रदाय क्षेत्रातील करत असलेल्या कार्याची दखल घेऊन (दि १७) पुणे येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे राज्यस्तरीय ‘ गुरुमाऊली सेवा गौरव ‘ पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिरिक्त महासंचालक ( Gurumauli Award ) यशदा पुणे शेखर गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर प्रा किसनराव कुऱ्हाडे पाटील,प्रा. प्रकाश कोळी तसेच मास्टर ट्रेनर यशदा पुणे विवेक गुरव सर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष प्रा डॉ प्रकाश चौधरी पुणे व सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच हभप गोपीचंद महाराज कचरे,( प्रवचनकार समिती ), हभप नितीन महाराज काकडे (नामजप समिती), हभप बाळासाहेब आडकर (उपाध्यक्ष), हभप प्रकाश जाधव ( विभागीय अध्यक्ष ), हभप लक्ष्मण भाऊ सातकर ( सप्ताह समिती ), हभप दत्ता महाराज केदारी ( सप्ताह समिती ),हभप बाळासाहेब जांभुळकर ( विणेकरी समिती ), हभप रमेश महाराज विकारी ( विभाग प्रमुख ) हभप बाबाजी बालगुडे (बालसंस्कार शिबीर समिती ) हभप रामदास धनवे ( विभागीय प्रमुख ) हभप शिवाजी लोंढे, हभप जनार्दन ठाकर, हभप अरुण मोरमारे,आदी श्री विठ्ठल परिवार मावळ मधील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ प्रकाश चौधरी यांनी केले.
त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू सांगून विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अविष्कार फाउंडेशनचे काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. करत असलेल्या कामांचे कौतुक करून सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी ( Gurumauli Award ) अविष्कार फाउंडेशन यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम असे कार्य करत आलेले आहे.कीर्तनकार,शिक्षक वकील सरपंच यांचा सत्कार केला अविष्कार फाउंडेशन करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली आणि सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
यशदाचे ट्रेनर विवेक गुरव सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर व पुणे येथून अनेक मान्यवर उपस्थित होते.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
जांभळे महाराज हे मावळ तालुक्यात कीर्तन, प्रवचनाच्या ( Gurumauli Award ) माध्यमातून समाज प्रबोधन करत आहेत. स्वामी विवेकानंद न्यासाचे ते संस्थापक असून त्या माध्यमातून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांचे वर्षभरासाठी पालकत्व स्वीकारून शैक्षणिक मदत करणे, संस्कार वर्ग घेणे, तसेच पाड्यावर जाऊन वनवासी दीपावली साजरी करणे. त्यामध्ये आदिवासींना कपडे, दीपावली फराळ देऊन त्यांच्याबरोबर आनंद उत्सव साजरा करणे.या वर्षापासून अध्यात्मिक गुरुकुलही महाराजांनी सुरू केलेले आहे.
श्री विठ्ठल परिवाराचे संस्थापक, मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही जांभळे महाराज यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
हभप गणेश महाराज जांभळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संपूर्ण तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत ( Gurumauli Award ) आहे.