मावळ ऑनलाईन – कलापिनीचे प्रांगण ‘गोविंदा रे गोपाळा’ या गजराने दुमदुमुन ( Kalapini) गेले ; कारण कलापिनी बालभवनने बालचमूंच्या दहीहंडीचे व पुस्तकहंडीचे आयोजन केले होते. यावेळी सगळी मुले राधाकृष्णाच्या वेशभूषेत छान नटुन थटुन आली होती. बालभवनचा सगळा परिसर छान छान सजवला होता. वेगवेगळी गोष्टीची पुस्तकेही लावली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर व कार्याध्यक्षा ( Kalapini) अंजली सहस्रबुध्दे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. त्यानंतर बालभवन प्रमुख मधुवंती रानडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन मुलांना दहीहंडीची माहीती सांगितली.
ज्योती ढमाले यांनी सर्वांना कृष्णजन्माची गोष्ट सांगितली.अध्यक्षांनी सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. कलापिनीचे अजीव सभासद श्री सवडकर हेही मुलांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.बालभवनची विद्यार्थिनी रेणू सहस्रबुध्दे हिने कृष्णाच सुंदर नृत्य सादर ( Kalapini) केले.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
त्यानंतर सर्व पालकांनी आणि मुलांनी गाण्याच्या तालावर छान फेर( Kalapini) धरला. नंतर सुरू झाला दहीहंडीचा एकच जल्लोष.
बालभवन मधे मुलांना स्वतःच्या हाताने दहीहंडी फोडायला मिळते याचा आनंद जास्त असतो. कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती भरपूर होती. कुमारभवनची मुलेपण दहीहंडीत आनंदाने सहभागी झाली होती. कार्यक्रमाची सांगता रुचकर अशा दहिकाल्याचा प्रसाद देऊन झाली. रामचंद्र रानडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या मुलांना चित्रकलेच्या वह्या बनवून घेऊन त्याच वाटप केले. शेवटी श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन मधुवंती रानडे, ज्योती ढमाले, माधवी एरंडे, मनिषा शिंदे, मीरा कोण्णूर, विशाखा देशमुख, रुपाली पाटणकर या सर्व प्रशिक्षिकांनी ( Kalapini) केले.