मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत औद्यागिक नगरीत (Vadgaon Maval News) अधिनियम अंतर्गत वडगाव नगरपंचायतची प्रारूप प्रभागरचना व प्रभाग संख्या निश्चित करण्यात आली आहे. याबाबत काही हरकती, सूचना असल्यास २१ ऑगस्टपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
Heavy Rain : मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी
वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर आज प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात (Vadgaon Maval News) आली असून, हरकती व सूचना असल्यास दाखल कराव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार, वडगाव नगरपंचायत हद्दीत पूर्वीप्रमाणेच १७ प्रभाग असून, रचनेमध्येही फारसा बदल झालेला दिसत नाही. तसेच प्रभागांची व सदस्यांची संख्याही १७असल्याचे यामुळे निश्चित झाले आहे. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून, त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर अंतिम प्रभाग रचना २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार (Vadgaon Maval News) आहे.
आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष
वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर सन २०१८ मध्ये पहिली निवडणूक झाली. त्या वेळी जशी प्रभागरचना करण्यात आली होती, तशीच प्रभागरचना या वेळी कायम राहिली आहे. त्यामुळे आता फक्त आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले (Vadgaon Maval News) आहे.