situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala: लोणावळ्याजवळ हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग; सहा प्रवासी सुखरूप

Published On:

मावळ ऑनलाईन – लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर (Lonavala)अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्यातील सालतर गावात 15 ऑगस्ट रोजी दुपारी हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग झाल्याची घटना घडली. परिसरात सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे वैमानिकाला उड्डाण सुरू ठेवणे अशक्य झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, सुदैवाने दोन वैमानिक आणि चार प्रवासी असे सर्व सहा जण सुरक्षित बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हेलिकॉप्टर लोणावळ्याकडे जात असताना हवामान अचानक बिघडले. मुसळधार पावसामुळे परिसरातील दृष्यमानता धोकादायक पातळीपर्यंत कमी झाली. परिस्थितीचा वेध घेत वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत सालटार गावाजवळील मोकळ्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरवले.

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील  4 ही धरणे सरासरी 96 टक्कांवर, पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट

घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या गावकऱ्यांनी सांगितले की, अचानक आकाशातून हेलिकॉप्टर खाली उतरताना पाहून आम्ही काही क्षणांसाठी घाबरलो. “एखादा अपघात झाला असावा, असे वाटले. पण प्रवासी आणि वैमानिक सुखरूप बाहेर आलेले पाहून आम्हाला दिलासा मिळाला,” असे एका ग्रामस्थाने सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते व हवामान वाहतूक दोन्ही प्रभावित झाली आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत हवाई प्रवास किती धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून, या प्रसंगात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. स्थानिक प्रशासनाने हेलिकॉप्टर सुरक्षित उतरण्यासाठी तत्काळ मदत केली असून, प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Follow Us On