मावळ ऑनलाईन – दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी वास्तु डेव्हलपर्स व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांचा संयुक्त विद्यमाने, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २०० विद्यार्थी तसेच २०० पालक यांनी एकत्रित आनंद लुटला. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. तसेच आकर्षक ५ लकी ड्रॉ घेण्यात आले, ज्यामध्ये विजेत्यांना एकूण ₹७,५५,०००/- किमतीची कूपने देण्यात आली.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
कार्यशाळेस सी.आर.पी.एफ. चे डी.आय.जी. श्री. वैभव चंद्रकांत निंबाळकर (I.P.S.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री कुमारी उर्मिला निंबाळकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.या प्रसंगी मावळ भागातील उल्लेखनीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये राज्यस्तरावर मल्लखांब खेळात यश मिळवलेल्या कु. गार्गी ईश्वर देशमाने हिचा गौरव करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कु. सेजल विश्वनाथ मोईकर हिने आशिया-पॅसिफिक आफ्रिका बेंचप्रेस चॅम्पियनशिप २०२४, दक्षिण आफ्रिका स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून तिचा सन्मान करण्यात आला.तसेच एस.बी.जी.एफ. तर्फे आयोजित अखिल भारतीय भगवद्गीता पठण स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या कु. अदित्री अभय व्यास हिचाही गौरव करण्यात आला.
विशेष सन्मान म्हणून लोहगड–विसापूर दुर्ग संवर्धन व लोहगड किल्ल्याचा UNESCO जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या ‘लोहगड विसापूर विकास मंचा’चा सत्कार करण्यात आला.यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत अरुण वारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषद बांधकाम अभियंता गौरी चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी “माझी वसुंधरा शपथ” घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.ही कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली नाही तर त्यांना समाजातील मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.