मावळ ऑनलाईन – पवना धरण ९९.१४ % भरलेले (Pavana Dam Alert) असून सध्या नदीपात्रात एकूण २१३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे १४०० क्युसेक व सांडव्याद्वारे ७३० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
Pune: पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के भरली; भीमा-नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने आज सकाळी नऊ वाजता सांडव्याद्वारे होणारा विसर्ग वाढवून १४६० क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील एकूण विसर्ग २८६० क्युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Lohagad Fort: किल्ले लोहगड व विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवारच्या अभिषेकाची अखंडित परंपरा
धरणातून होणारा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार टप्प्याटप्प्याने कमी-जास्त (Pavana Dam Alert) केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.