मावळ ऑनलाईन –भारत विकास परिषद आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा 2025’ ही (Saraswati Vidyamandir)विभाग स्तरावरील स्पर्धा नुकतीच निगडी येथे पार पडली.
यामध्ये एकूण नऊ संघ सहभागी झाले होते. त्यात हिंदी व संस्कृत समूहगीत सादर करायचे असून वादकांची संख्या जास्तीत जास्त तीन होती. सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक विभागाचा यामध्ये प्रथम क्रमांक आला असून समूहगीतास मार्गदर्शन कल्याणी मंदार जोशी या शिक्षिकेने केले होते. त्यांना सहकार्य संस्कृत शिक्षक सुनीता कुलकर्णी व अनिरुद्ध किल्लेदार यांनी केले होते.
विशेष म्हणजे शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या(Saraswati Vidyamandir) विद्यार्थ्यांनी वादनासाठी खूप छान सहकार्य केले. सर्व विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र व शाळेला ट्रॉफी मिळाली आहे. प्रथम क्रमांक आल्यामुळे शाळा प्रांत स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र झाली आहे.
सर्व सहभागी विश्री दिलीप कुलकर्णी, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.