मावळ ऑनलाईन – ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे (Talegaon Dabhade)नवे दालन उपलब्ध करून देण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे रूड सेट संस्था आयोजित ३० दिवसीय वस्त्रचित्र कला उद्योग प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या उपक्रमात ३५ महिलांनी सहभाग नोंदवला असून, महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची ही संधी ठरली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला अध्यक्षा व यशस्वी उद्योजिका शैलजा काळोखे यांनी केले.
प्रशिक्षण वर्गातील प्रदर्शनाचे उद्घाटन शैलजा काळोखे व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगावच्या सदस्य दीक्षा वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना (Talegaon Dabhade) दीक्षा वायकर यांनी महिलांनी छोट्या उद्योगांद्वारे आर्थिक सबलीकरण साधण्याचे आवाहन केले.
PMC : पुणे महापालिकेचा गळती शोध पथक उपक्रम; अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रूडसेट संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार यांनी भूषविले. त्यांनी आपल्या भाषणात महिलांसाठी कौशल्यविकासाचे (Talegaon Dabhade) प्रशिक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “कलेद्वारे आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधणे आवश्यक आहे. महिलांनी आपल्या क्षमतेचा उपयोग करून समाजात ठसा उमटवावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्त्रचित्र कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी कलाकृतींचे कौतुक करत महिलांना बाजारपेठ, गुणवत्तापूर्ण उत्पादन व गटशक्तीचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन (Talegaon Dabhade) केले.
प्रशिक्षणातून आत्मविश्वास वाढल्याचे मत अनेक प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केले. “घरकामासोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावता येईल,” अशी प्रतिक्रिया एका महिला प्रशिक्षणार्थीने दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षक संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दिनेश निळकंठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरीश बावचे, योगिता गरुड, दिनेश निळकंठ व रवि घोजगे यांनी विशेष प्रयत्न (Talegaon Dabhade) केले.