मावळ ऑनलाईन – वडगाव मावळचे वतीने (Maval Garjana Pratishthan) दरवर्षीप्रमाणे शनिवार दि १६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या भव्य प्रांगणात आकर्षक रुपये – ७,७७,७७७/- रोख बक्षिस तसेच बाल कलाकारांचे विविध नृत्याविष्कारासह हा दिमाखदार सोहळा – मुंबई, पनवेल, लोणावळा, येथील सात गोविंदा पथकांचे नियोजनबद्ध, हर्षोल्हासात आणि जोशपूर्ण वातावरणात पाच/सहा/सात – थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली. वडगाव आणि मावळ परिसरातील हजारो नागरिक बंधू भगिनी,बाळ गोपाळ हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथक लोणावळा यांनी पटकावला. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे आणि हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रात्री- १०:०० वाजता दहीहंडी फोडण्यात आली, आणि एकच जल्लोष झाला.जय भवानी जय शिवाजी ! गोविंदा रे गोपाळा ! गणपती बाप्पा मोरया! या जयघोषणांनी आसमंत निनादला.तत्पूर्वी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या (Maval Garjana Pratishthan) हस्ते दहीहंडी पूजन करून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
गुलाबराव म्हाळसकर- मा.सभापती पं.स.मावळ, संभाजी म्हाळसकर, -अध्यक्ष भाजपा वडगाव,प्रभाकर वाघमारे -जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अतुल राऊत – अध्यक्ष-पुणे जिल्हा ओबीसी (श.प.गट), विशाल वहिले- अध्यक्ष युवा मोर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेस,सुनील शिंदे -उद्योजक, बाळासाहेब वाघमारे – जेष्ठ पत्रकार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आणि मा.रुपेश म्हाळसकर (मा.अध्यक्ष मनसे मावळ) यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध संपन्न होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यास भेट देण्यासाठी वडगाव तसेच मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा (Maval Garjana Pratishthan) आणि बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
PMC : पुणे महापालिकेचा गळती शोध पथक उपक्रम; अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी
सायलीताई बोत्रे – अध्यक्ष भाजप मावळ महिला आघाडी,’ सीमाताई आहेर -अध्यक्ष भाजप नाणे मावळ महिला आघाडी, पूजाताई पडवळ- सरपंच वेहेरगाव,अनुराधा शिंकारे -कायदेतज्ञ मुंबई हायकोर्ट,
मीनादीदी गुप्ता- साधक प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,
गणेश काकडे-मा.उपाध्यक्ष तळेगाव नगर परिषद, किरण म्हाळसकर- मा.नगरसेवक,राहुल ढोरे- मा. उपनगराध्यक्ष,चंद्रजीत वाघमारे- मा.उपनगराध्यक्ष, राजेंद्र कुडे – मा. उपनगराध्यक्ष,गणेश विनोदे- जेष्ठ पत्रकार, प्रसाद पिंगळे -मा. नगरसेवक, रोहीत लांघे – मा.नगरसेवक,सुनिल कारंडे- मा.नगरसेवक,आशिष खांडगे,अजय भवार,नितीन कुडे,अनिल ओव्हा त्याचप्रमाणे मा.सायली म्हाळसकर यांच्या सूत्रबद्ध नियोजनानुसार महिला भगिनींचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रेखा भेगडे – पत्रकार,अश्वीनी म्हाळसकर, सुनंदा म्हाळसकर -अध्यक्ष बचत गट वडगाव,पूजा वहिले- मा.उपनगराध्यक्ष, माया चव्हाण- मा.उपनगराध्यक्ष,पूनम जाधव – मा.उपनगराध्यक्ष, कल्पना पगडे,ज्योती चव्हाण, रुपाली क्षीरसागर,वडगाव शहरातील जेष्ठ नागरीक संघानेही (Maval Garjana Pratishthan) या सोहळ्यास उपस्थित राहून सक्रीय सहभाग नोंदवला.
उपस्थित सर्वांचे स्वागत सायली म्हाळस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन – तानाजी तोडकर यांनी केले
हा दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी – सुरज भेगडे, सुरेश जाधव, संतोष म्हाळस्कर,मच्चीन्द्र मोहिते, योगेश म्हाळसकर,सागर शेलार,विकास साबळे, प्रणव म्हाळस्कर, अनिल नायर, गणेश भांगरे, ओंकार भांगरे, शुभम म्हाळस्कर, गणेश मालपोटे, जयंत कुंभार, नवनाथ शिवेकर, महेंद्र शिंदे,रोहीत कोळी, संग्राम भानुसघरे यांनी विशेष परिश्रम (Maval Garjana Pratishthan) घेतले.