मावळ ऑनलाईन – पारंपारिक पद्धतीने पुरातन काळापासून ( Kamshet) गोकुळ अष्टमी व गोपाळकाला दहीहंडी उत्सव हा पारंपारिक पद्धतीने प्रत्येक गावामध्ये नाथ संप्रदाय यांच्या अस्थान्यावर घेण्यात येतो .

Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
नाथ सांप्रदायाचा उगम हा भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून झालेला आहे .जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजला होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी नऊ नारायण यांची सभा बोलावली व यांना पृथ्वीतलावर अवतार घेण्यास सांगितले. त्यानुसार नवनाथांनी पृथ्वीतलावर अवतार घेतले व आपल्या ( Kamshet) अवतार कार्य चालू केले. म्हणून नाथ संप्रदायमध्ये भगवान श्रीकृष्ण यांना अनन्य महत्व आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक नाथांच्या मंदिरामध्ये किंवा अस्थान्यावर श्रीकृष्ण जन्माष्टमी व मानाची दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
PMC : पुणे महापालिकेचा गळती शोध पथक उपक्रम; अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी
कामशेत शहरांमध्ये मोठ्या आनंदामध्ये उत्सव साजरा करण्यात आला .यावेळी नाथ बाबांची गादी भरण्याचा कार्यक्रम,महाआरती, दहीहंडी आणि महाप्रसाद यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. याचे आयोजन गुरुवर्य कै. भरत भिकाजी शिंगारे, ओम ब्रह्मचैतन्य कानिफनाथ सेवा मंडळ कामशेत गावठाण यांच्यावतीने करण्यात ( Kamshet) आले .