दहीहंडी म्हणजे संस्कार व एकीची जोपासना
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील असणाऱ्या वारंगवाडी (मावळ) गावात(Vadgaon Maval) गोकुळाष्टमीचा उत्सव दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. तसाच याहीवर्षीही मोठ्या आनंदात ढोल- ताशाच्या गजरात जल्लोषात साजरा झाला. वारंगवाडीतील दहीहंडीला लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात नाहीत; मात्र परंपरेचा अनमोल वारसा आजही तेवढ्याच निष्ठेने जतन केला जात आहे.
महाराष्ट्राची अनोखी परंपरा जपणारे वारंगवाडी हे गाव आजही डीजे, डॉल्बीच्या गोंगाटाला बळी न पडता संस्कृतीची मुळे घट्ट रोवून परंपरा जपत आहे.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
गावात गोकुळाष्टमीच्या दिवशी तीन-चार ठिकाणी कानिफनाथ देवाचे आस्थांने (कलवडे,वारींगे व नखाते हे तीन परीवार) असून येथे अंगात वारे घेऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव ढोल, ताशा, नगारा, झांज वाजवत मोठ्या आनंदात साजरा केला जातो.मोठी मंडळी लहानांना परंपरेचे संस्कार व एकीची जोपासना शिकवतात.
श्रावण महिन्यालाही गावात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात घरोघरी व सार्वजनिक मंदिरांत श्रीभक्तीविजय, पांडव प्रताप, नवनाथ ग्रंथ, जैमिनी अश्वमेध, हरिविजय, काशीखंड, रामविजय, संत तुकाराम चरित्र अशा विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन-श्रवण केले जाते. महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण होऊन संस्कारक्षम पिढी घडावी हाच मुख्य उद्देश आहे.


श्रीकृष्ण जन्माच्या वेळी रात्री १२:०० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व तीनही आस्थांन्यामध्ये श्रीकृष्ण जन्म भजन,पाळणा गाऊन देवावर पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
या गावातील दहीहंडी ही स्पर्धा नसून मैत्री व एकीची जपणूक आहे. बक्षिसांची हाव नसली तरी ग्रामस्थ दही – हंडीच्या निमित्ताने एकत्र येतात. सकाळपासून देवाच्या आस्थानांवर अंगात वारे घेतले जातात. देवाच्या शासनकाठीची गुलालाच्या जल्लोषात गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून पूजन केले जाते. तीन ठिकाणी उंचावर हंड्या बांधलेल्या असतात. ज्याच्या अंगात वारे येतात तोच व्यक्ती उडी मारून डोक्याने हंडी फोडतो. हंडी फुटताच उत्साहाचा जल्लोष उसळतो. सर्व अबालवृद्ध, माता-भगिनी या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
समारोपाच्या वेळी अंगात वारे आलेल्या प्रत्येकास चाबूकाचे फूल देऊन वारे शांत केले जातात. त्यानंतर संपूर्ण गाव महाप्रसादासाठी तीनही आस्थांनावर एकत्र जमतात सर्व ग्रामस्थ प्रसादाचा आस्वाद घेत उत्सवाचा समारोप करतात. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री सुदर्शन तरुण मंडळ व श्री सुदर्शन भजनी मंडळ यांनी केले होते.
ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गोकुळातील सर्व अन्नपदार्थ एकत्र करून त्याचा काला करून गोपाळांना खाऊ घालत असे तीच प्रथा वारंगवाडी गावात प्रत्येक घरातील अन्नप्रसाद त्यामध्ये खोबरे ज्वारीच्या लाह्या दही यांचं एकत्रिकरण करून तो गोपाळकाला एका ताटातून गावातील सर्व लहान थोरांना भरवला जातो ही लक्षवेधी बाब वारंगवाडीच्या दहीहंडी उत्सवात आजही जपली जाते