मावळ ऑनलाईन – ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन(Vadgaon Maval) यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या सार्वत्रिक रक्तदान शिबिरामध्ये जैन सकल संघ वडगांव मावळ यांनी देखील सहभाग नोंदवला.
जैन स्थानक वडगांव मावळ येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरामध्ये भाग घेतला.रक्तदात्यांना जैन संघाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली
लायन्स क्लब प्रांत ३२३४ डी २ चे प्रांतपाल एम. जे. एफ. राजेश अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थिती या शिबिरास लाभली.
जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा , श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक बाफना , राजेश बाफना, झुंबरलाल कर्नावट, डॉ.सुनील बाफना, सुरेंद्र बाफना, रोहन मुथा, अमोल बाफना , आतिश कर्नावट , सनी सुराणा, निलेश कोठारी , चिराग कोठारी , निकेश ओसवाल , प्रिन्स पुनमिया, आदेश मुथा , गिरीश गुजराणी, वितराग मुथा तसेच जैन युथ ग्रुप आदींनी नियोजन केले.अशी माहिती समन्वयक मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी दिली.
Jyoti Chandekar: लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
जैन संघाच्या वतीने राजेश बाफना यांनी आभार मानले.