मावळ ऑनलाईन –जैन सकल संघ , वडगांव मावळ यांच्या वतीने (Rupal Chordia)जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र असलेले पर्व पर्युषण प्रारंभाच्या निमित्ताने मुलांचे संगोपन , ज्येष्ठांचा सहवास , धार्मिक संस्कार … काळाची गरज या विषयावर व्याख्यान देताना पुणे येथील जैन परंपरा या मासिकाच्या संपादिका ॲड. रुपल चोरडिया यांनी जीवनात संस्कार, कर्म आणि सकारात्मक कार्यशैली अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
लवकरच सुरू होणाऱ्या पर्व पर्युषण प्रारंभाच्या निमित्ताने (Rupal Chordia) महावीर आनंद भवन वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानामध्ये ॲड.रूपल चोरडिया यांनी आपले मत व्यक्त केले.
जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा , संभवनाथ मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष सचिन ओसवाल , राजेश बाफना , डॉ.सुनील बाफना, अशोकलाल गुजराणी, सुरेंद्र बाफना, झुंबरलाल कर्नावट, कांतीलाल बाफना, विजय बलदोटा, दिलीप बलदोटा , रोहन मुथा, अमोल बाफना , दिलीप मुथा, अमोल मुथा , सनी सुराणा, राजेंद्र शांतीलाल बाफना , आनंद बाफना, धीरज जैन, अमित मुथा, निखिल बाफना , वीतराग मुथा आदी उपस्थित होते.

मंगल बाफना यांनी नवकार महामंत्राचे पठण केले, आणि वक्त्यांची ओळख प्रीती बाफना यांनी करून दिली.सूत्रसंचालन गिरीश गुजराणी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश बाफना यांनी केले.पर्व पर्युषण काळामध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल वडगांव नगरीत होणार आहे.
Adarsh Vidyalaya: “आदर्श विद्यालयात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
Jyoti Chandekar: लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन
या व्याख्यानासाठी लहान मुलांसह महिला भगिनी, जेष्ठ नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती समन्वयक नगरसेवक भूषण मुथा यांनी दिली.