मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे नगर परिषद तर्फे (Talegaon Dabhade)संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण (७५०) महोत्सवी वर्ष जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन मुख्यधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पालखी सोहळा नगर परिषद कार्यालय येथे सुरु होऊन मारुती मंदिर चौक ते राजेंद्र चौक मार्गे शाळा चौक येथील विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची आरती करून संपन्न झाला.
Adarsh Vidyalaya: “आदर्श विद्यालयात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
सोहळ्यामध्ये कर निरीक्षक मोनिका झरेकर, अभियंता गौरी चव्हाण, लिपिक प्रविण माने, बाळासाहेब पवळे, प्रविण शिंदे, शिपाई अनिल इंगळे, चंद्रशेखर खंते, रुपेश देशमुख आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच नगर परिषद शाळेंचे मुख्याध्यापक केशव चिमटे, वैशाली मिरगे, अनिता तिकोने, संध्या कुलकर्णी, संजय चांदे, वर्षा थोरात, वसुंधरा माळवाडकर लिपिक मयुरेश मुळे आणि सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.