मावळ ऑनलाईन – “आदर्श विद्यामंदिर मध्ये 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन (Adarsh Vidyalaya)वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव यादवेंद्रजी खळदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे सहसचिव वसंत पवार, सदस्य दत्तात्रय बाळसराफ तसेच आदर्श विद्या संकुलातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रकार सादर केले. ज्यांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची गाथा लिहिली, त्या सर्व क्रांतिकारकांचे सर्वांनी स्मरण करूया.आपल्या भारत देशात विविधतेत एकता असून ही आपली शान आहे म्हणूनच माझा प्राणप्रिय भारत देश महान आहे अशा शब्दात संस्थेचे उपसचिव वसंत पवार यांनी आपले प्रास्ताविक केले.
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
ज्या थोर मंडळींनी देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली. आपल्याला स्वातंत्र्य दिले म्हणूनच आज आपण स्वतंत्र आहोत, तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांनी जो उद्याचा नागरिक होणार आहे त्याने आपल्या देशाबद्दल देशवासीयांबद्दल मनामध्ये कृतज्ञता ठेवली पाहिजे.आपले देशाबद्दल काय कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येकाने मनात ठेवून काम केले पाहिजे, हेच आपले कर्तव्य आहे हे संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये इयत्ता दहावी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून 100% यशाची परंपरा कायम राखण्यात मोलाची कामगिरी केली अशा विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी मध्ये शाळेत प्रथम आलेली तन्वी गोविंद जाधव, द्वितीय क्रमांक श्रावणी भोसकर व श्रवण बेल्हेकर व तृतीय क्रमांक जान्हवी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इयत्ता पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून संस्थेच्या आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला ,अशा विद्यार्थ्यांचा देखील संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी 43 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 37 विद्यार्थी पात्र ठरले असून शेकडा 86 टक्के निकाल लागला. एकूण आठ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून मावळ तालुक्यात सर्वाधिक निकाल लावला. कुमारी सौम्या अमोल अलबते हिने 90.60% गुण मिळवून मावळ तालुक्यात शहरी विभागात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले. जिल्हा गुणवत्ता यादीत तिने विसावा क्रमांक मिळवला. कुमारी रोशनी बापूराव गुंजाळ मावळ तालुक्यात सातवी, जिल्ह्यात 190 वी. चिरंजीव अमेय विजय करडे तालुक्यात नववा, जिल्ह्यात 215वा. कुमारी संस्कृती मनोहर सोमवंशी तालुक्यात अकरावी, जिल्ह्यात 258 वी. चिरंजीव संकेत निलंगा गडदे तालुक्यात 14 वा जिल्हात391 वा. कुमारी तन्वी दत्तोबा शेंबडे तालुक्यात 17 वी, जिल्ह्यात 419 वी. कुमारी नम्रता विठ्ठल मोकाशी तालुक्यात 21 वी,जिल्ह्यात 471वी.चिरंजीव कार्तिक विनोद देसले तालुक्यात विसावा, जिल्ह्यात 477 वा आला असून या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने यश मिळवले आहे. इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कुमारी शौर्या दामोदर गदादे हिने तालुक्यात नववा व जिल्ह्यात 233 वा क्रमांक मिळवला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आदर्श विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी शुभम गुलाब सातकर या विद्यार्थ्याने 2020 या वर्षात ग्राम परिवर्तन अभियानात मुख्यमंत्री प्रतिनिधी म्हणून काम करून शेतकऱ्यांना संघटित केले.फार्मर्स प्रोडीसर ही कंपनी सुरू करण्यात बहुमोल योगदान दिले.
त्याच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुशांत सुनील वानखेडे या विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेत उत्तुंग ध्येय ठेवून अथक प्रयत्नांनी यश मिळवले, त्याची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सामान्य प्रशासन विभागात कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. देशभक्तीपर गीत कुमारी हर्षल असवले हिने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ प्रतीक्षा ढवळे यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार तसेच सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले .कार्यक्रमासाठी सर्व पालक वर्ग उपस्थित होते.