मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ येथे ज्येष्ठ नागरिक(Vadgaon Maval) संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी रामदास म्हाळसकर यांची तर कार्याध्यक्षपदी किसनराव वहिले यांची निवड करण्यात आली.
Jyotiba Vidyalaya : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त ज्योतिबा विद्यालयात पसायदान पठण
नुकताच संघाचा पदग्रहण समारंभ संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अविनाश(Vadgaon Maval) बवरे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर साबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आचार्य आयुर्वेदिक फाउंडेशनचे संस्थापक डॉ रवींद्र आचार्य,कामशेत जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजन परदेशी, ह भ प दत्तात्रय टेमगिरे, ह भ प दत्ता महाराज शिंदे, निवृत्त पोलीस निरीक्षक दिलीपसिंह परदेशी, उपाध्यक्ष नारायण ढोरे, तसेच त्रिवेणी नगर,पिंपरी,चिंचवड, उर्से सोमाटणे कामशेत,टाकवे बुद्रुक, नायगाव, सांगवी, जांभूळ, कान्हे आधी गावातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश बवरे यांनी जेष्ठ नागरिक हा देशाचा, समाजाचा, गावचा, कुटुंबाचा आधारस्तंभ असून त्यांच्याकडे समाजाला देण्यासाठी मोठा अमूल्य ठेवा आहे तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी हा अमूल्य ठेवा समाजाला देण्याचा प्रयत्न करावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा फायदा करून घ्यावा असे मार्गदर्शन केले.
निवृत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी ज्येष्ठ नागरिक(Vadgaon Maval) ही देशाची सर्वात मोठी संपत्ती असून ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता का आहे तसेच ज्येष्ठांनी आपले उर्वरित आयुष्य कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले.
आचार्य आयुर्वेदिक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ रवींद्र आचार्य यांनी निरोगी आयुष्य कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास म्हाळसकर यांनी(Vadgaon Maval) केले. तर सूत्रसंचालन बाळासाहेब बोरावके यांनी केले. आभार झुंबरलाल कर्नावट यांनी मानले
नियोजन अध्यक्ष रामदास म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष किसनराव वहिले, उपाध्यक्ष नारायण ढोरे,सचिव देविदास शिदोरे, सहसचिव राजाराम म्हाळसकर, खजिनदार चंद्रकांत ठोंबरे, सहखजिनदार झुंबरलाल कर्नावट,जनसंपर्क अधिकारी सुदेश गिरमे, सोमनाथ काळे,सल्लागार ऍड शिवदास मोरे,विलासराव जाधव, कार्यक्रम प्रमुख अनिल गुरव यांनी (Vadgaon Maval) केले.