पुष्प 4 थे
मावळ ऑनलाईन ( विवेक कुलकर्णी) – आजच्या काळातला एक उत्तम गजलकार आणि त्याहूनही एक उत्तम माणूस( Favorite Sher) म्हणून गजल विश्वातला परिचित असलेल्या,प्रत्येकाला आपला दादा (भाई नव्हे, मोठा भाऊ) वाटणाऱ्या प्रमोद खराडे यांचा हा सार्वकालीन महान शेर तर आहेच पण मराठी गजल विश्वातला लोकप्रियही आहेच. प्रमोददा, तरल स्वभावाचा, सज्जन माणूस आहे. त्याच्या या स्वभावाचा प्रत्यय त्याच्या गजलेत नेहमीच येतो.हा शेर त्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातला आहे.
Pune Metro : १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार
वेदनेसोबत घरोबा ही कल्पनाच किती अफाट आहे, पहा. एखाद्या मित्रासोबत घरोबा होणे ही अतिशय कॉमन गोष्ट आहे, पण इथे चक्क वेदनेसोबतच घरोबा झालाय असे शायर सांगतोय आणि विशेष बाब म्हणजे या घरोब्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे शायर सांगतोय.
Talegaon Dabhade News : हाडांची घनता तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद
दुःखासोबत आनंदी राहणे आणि त्या दुःखालाही आनंदी वाटणे हे अजिबोगरीब पण प्रत्येकाने आचरणात आणावे असे वास्तव या शेरात शायराने चपखल मांडले ( Favorite Sher) आहे. खरं तर सुख काय किंवा दुःख काय हे आयुष्यात अपरिहार्यच, त्यामुळेच आहे त्या परिस्थितीत माणसाने आनंदी रहावे अशी शायराची वैश्विक अपेक्षा आहे किंवा एक प्रकारचा प्राचीन संदेशच त्याने दिलाय पण तो इतका सुंदररित्या सांगितला आहे की ते तत्वज्ञान न वाटता आपलीच भाषा वाटते.
साहित्य लिहताना आपल्या हातून असे काही लिखाण व्हावे की ते आपल्या इतकेच वाचकांनाही आपले वाटावे इतके उत्तम असावे असे नेहमीच म्हटले जाते , मराठी गजल विश्वात हा शेर ज्या प्रकारे सिग्नेचर शेर म्हणून ओळखला जातो ते पाहता हेच खरे असे मनाला पटले नाही तरच नवल.यापुढेही प्रमोद खराडे यांच्या हातून असेच उत्तमोत्तम लिखाण होत राहो ही त्याचा चाहता म्हणून ( Favorite Sher) प्रामाणिक अपेक्षा.
रसग्रहण
विवेक कुलकर्णी.