मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिर (Adv. Pu.Va. Paranjape Vidya Mandir)यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य कै.अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरात घेण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नू.म.वि.प्र. मंडळाचे सचिव संतोष खांडगे, सदस्यमहेशभाई शहा,श्री.सोनबा गोपाळे , शालेय समितीचे सदस्य अशोकराव काळोखे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे माजी मुख्याध्यापकबाळासाहेब शिंदे तसेच सर्व शाळांमधील मुख्याध्यापक ,शिक्षक व पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी प्रास्ताविकात शाळेचा चढता आलेख व बौद्धिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांचा व वाढत्या विद्यार्थी संख्येचा आढावा आपल्या प्रास्ताविकेतून मांडला.
संतोष खांडगे यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शाळा आणि वाढत असलेल्या विद्यार्थी संख्येचे कौतुक केले. तसेच या स्पर्धांमध्ये चित्रकला स्पर्धेचा देखील समावेश करावा असे सुचवले.
अशोकराव काळोखे यांनी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.
सोनबा गोपाळे यांनी बौद्धिक स्पर्धेमध्ये होत गेलेले बदल सांगितले आणि विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन
PMPML: रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसाच्या कालावधीत पीएमपीएमएल ने कमावले तब्बल 10 कोटी
पद्य पाठांतर, निबंध व वक्तृत्व अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला विद्यार्थ्यांना अनुक्रमे ७००₹,६००₹,५००₹,१००₹ रोख रक्कम ,प्रशस्तीपत्र व ट्रॉफी असे पारितोषिक देण्यात आले .तसेच सर्व विद्यार्थ्यांची सहभागाची प्रमाणपत्र देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी बौद्धिक स्पर्धा विभाग प्रमुख दीप्ती बारमुख यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती बारमुख व रजनी बधाले यांनी केले तसेच आभार शाळेच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.