मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील देवघर (गट नं. 250) परिसरात वाढत्या अनाधिकृत बांधकामांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी ( Unauthorized construction)व्यक्त केली असून, त्वरीत कारवाई करण्याची मागणी वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रदीप नाईक यांनी याबाबत अधिकृत निवेदन देऊन संबंधितांना तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेमध्ये उद्या पाणी नाही!
निवेदनानुसार, निसर्गमय आणि जुना मुंबई–पुणे हायवे लगत असलेल्या देवघर गावात अनेक गुंतवणूकदारांनी परवानगी न घेता भव्य बंगले उभारले आहेत. हे बंगले भाडेतत्वावर देऊन मालक मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवत असून, प्रशासनाचा कर बुडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामामुळे निर्माण झालेला राडारोडा ( Unauthorized construction)आणि धुळीमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025 : बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न
प्रदीप नाईक यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरील लोकांना हे बंगले भाड्याने देऊन रेव्ह पार्टीसारखे अवैध धंदे सुरू आहेत. अशा कार्यक्रमांमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तक्रार करण्यास गेल्यास बाहेरील गटांकडून जिवाची भीती असल्याने अनेक ग्रामस्थ गप्प बसत आहेत.
या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने जसा पूर्वी अनधिकृत बंगले पाडण्याचा निर्णय घेतला होता, तशीच कारवाई मावळ तालुक्यात तातडीने व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “कायद्याचा धाक आणि प्रशासनाचा वचक राहावा, तसेच करचुकवेगिरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे,” असे नाईक यांनी आपल्या निवेदनात नमूद ( Unauthorized construction) केले आहे.