मावळ ऑनलाईन – श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थांनचे विश्वस्त, सुदवडी येथील आदर्श कामगार प्रतिनिधी, यशस्वी उद्योजक ( Shrikshetra Bhandara Dongar) आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व शांताराम कराळे पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस हॉटेल इंद्रायणी येथे विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भंडारा डोंगरावर वृक्षारोपण,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तसेच शिक्षण महर्षी व माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या जयंतीनिमित्त कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानला अकरा हजार रुपयांची देणगी अर्पण करण्यात आली.
समाजाची बांधिलकी जपत अध्यात्मिक क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करणारे, नोकरी व व्यवसाय सांभाळत समाजकार्यात सक्रिय राहणारे आणि रोखठोक स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणजे शांताराम कराळे पाटील, असे गौरवोद्गार भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांनी काढले.
Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंद्रायणी हॉटेलचे मालक व उद्योजक गजानन शेलार हे होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे, युवा कीर्तनकार व सुदुंबरे सोसायटीचे संचालक गजानन कराळे पाटील, धनंजय गाडे, विठ्ठलराव काळोखे, माजी उपसरपंच रमेश कराळे, आदर्श कामगार मंगेश डिकोळे यांनी भावना व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Shrikshetra Bhandara Dongar) दिल्या.
कार्यक्रमाला दत्तामामा भेगडे, उद्योजक समीर कोयते, माजी सरपंच नामदेव भसे, माजी उपसरपंच नितीन ताठे, माजी उपसरपंच यशस्वी राजेंद्र गाडे पाटील, नितीन शिंदे, बाळासाहेब कराळे, उद्योजक निलेश कराळे पाटील, अजित कराळे पाटील, अजित गाडे, पंकज खराटे, सुदुंबरे सोसायटीच्या ( Shrikshetra Bhandara Dongar) संचालिका प्रमिला संजय गाडे, ग्रामपंचायत सदस्य शोभा धनंजय गाडे आणि यशस्वी उद्योजिका पूनम शांताराम कराळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व सूत्रसंचालन संजय गाडे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब कराळे पाटील ( Shrikshetra Bhandara Dongar) यांनी मानले.