मावळ ऑनलाईन – वडगाव शहरात कचरा उचलण्याच्या (Vadgaon Maval News) अनियमित कार्यपद्धतीमुळे कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे, त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी तसेच कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी मनसेच्या माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी केली आहे.
Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन
याबाबत सायली म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत मार्फत पुरवली जाणारी अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे कचरा संकलन (Vadgaon Maval News) करणे जे,संपूर्ण शहरात दररोज घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करून पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तो कचरा पूर्णतः संकलित होतो असं नाहीच कचरा गाडी वेळेवर न येणं,गाड्यांची अपुरी संख्या किंवा आवाज ऐकू न येणे अशा एक ना एक कारणास्तव नागरिकांच्या घरामध्ये दैनंदिन उचलला जाणारा कचरा हा तसाच पडून राहत असतो.
Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
त्यामुळे नागरिक तो कचरा गाडीमध्ये न टाकता सर्रासपणे रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकतानाचे निदर्शनास येत आहे. इतरत्र पडलेल्या कचऱ्यामुळे शहरात (Vadgaon Maval News) मोठी दुर्गंधी पसरू लागली असून जागोजागी अस्वच्छतेचे प्रदर्शन दिसू लागल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होऊ लागली आहे परिणामी वाढत चाललेल्या कचऱ्याच्या साम्राज्याला आळा घालण्यासाठी वडगाव नगरपंचायत मार्फत अत्यंत शीघ्रतेने योग्य ती पावले उचलण्याची गरज भासू लागली आहे.
तसेच शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी दैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या कचरा गाड्यांची संख्या वाढवून सकाळच्या सत्रात कचरा संकलन करून गाड्यांचे सुधारित वेळापत्रक व तक्रार निवारणासाठी संपर्क नंबर जाहीर करून नागरिकांना कचरा गाडीत कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात यावे तसेच सर्रासपणे उघड्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.आवश्यकता भासत असल्यास यासाठी सीसीटीव्हीचा वापर करावा अशीही सूचना करण्यात (Vadgaon Maval News) आली आहे.
वर उल्लेखित मुद्द्यांवर आपल्या स्तरावरून त्वरेने उपाययोजना अस्तित्वात आणावी जेणेकरून आपला सकारात्मक प्रतिसाद नागरिकांना स्वच्छतेची प्रेरणा देऊन दीर्घकाळ स्मरणात राहील. अशी विनंती देखील निवेदनात केली आहे.
निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात नगरपंचायत कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करेल व याला सर्वस्व जबाबदार नगरपंचायत प्रशासन राहील असेही म्हटले (Vadgaon Maval News) आहे.