मावळ ऑनलाईन –नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच(Talegaon Dabhade) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इनक्यूबेशन सेंटर आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये उद्योजकीय कौशल्यांचा विकास आणि नवनवीन संकल्पना आणि विचारसरणीला चालना देणे हा होता.
या प्रसंगी संस्थचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन,मास्क ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रमुख राजेश म्हस्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार,प्राचार्य डॉ. एस. एन.सपली, एनआयसीचे सीईओ प्रा. मुजाहिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
MLA Sunil Shelke : रोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार
शून्यातून उद्योग उभारण्याचा प्रेरणादायी प्रवास, व्यावसायिक आव्हाने आणि टप्पे,व्यावसायिक धोरणे,नेतृत्व,उद्योजकांची चिकाटी या सर्व विषयांवर म्हस्के यांनी सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अनुभव सिद्ध उपयुक्त उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मुजाहिद शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिल्का सुप्रिया या विद्यार्थिनीने केले. डॉ.रामचंद्र जहागीरदार यांनी आभार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे नियोजन आयआयसीचे डीन डॉ. एम. के. बिरादार आयआयसीचे डीन सहसंयोजन नीलिमा बावणे आणि एनआयसी कार्यवाहक आकांक्षा लोहार यांनी केले.