मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – १५ (१३.२५ पर्यंत), शके १९४७. वार – शनिवार. तारीख – ०९.०८.२०२५. (Rashi Bhavishya 9 August 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – रक्षाबंधन.
राहू काळ – सकाळी ९.३० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – श्रवण १४.२४ पर्यंत नंतर धनिष्ठा. चंद्र राशी – मकर.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 9 August 2025
कार्यक्षेत्रात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. पूर्वी घेतलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आज तुम्ही घरातील थोर मंडळींची मने जपण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के मिळणार आहे. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना आज साधनेची प्रचिती येईल.
मिथुन (शुभ रंग – निळा)
व्यवसायात आपल्या क्षमतेच्या बाहेर आर्थिक जोखीम घेऊ नका. आज जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्या. संध्याकाळी वाहन जपून चालवा.
कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
अति आक्रमकता टाळा. वादविवाद टाळून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. कोणतेही निर्णय घेताना आज जोडीदारास विश्वासात घेणे हिताचे राहील.
Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर चालकाला लुटले
सिंह ( शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 9 August 2025
उद्योग व्यवसायात ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रकृतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे.
कन्या (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्यासाठी आनंदी व उत्साही दिवस आहे. तुम्ही आपले आवडते छंद जपण्याचा प्रयत्न कराल. प्रिय मित्रांच्या सहवासात जुन्या आठवणी ताज्या कराल.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. आज संध्याकाळी तुम्ही सहकुटुंब चैन कराल.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाणार आहे. मुले तर आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमणार आहेत.
धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 9 August 2025
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वाद विवादात आज तुमचीच सरशी होईल. तरीही नाती जपायची असतील तर कठोर शब्दप्रयोग टाळा.
मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही कुठेही आपली मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज उत्साही दिवस आहे.
कुंभ ( शुभ रंग- मरून)
व्यवसायात जमाखर्चाचे अंदाज चुकतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोला.
मीन ( शुभ रंग – आकाशी)
धंद्यातील येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. आज दिवस लाभाचा असल्याने जे जे चिंताल ते ते होईल. शुभच चिंता.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424