मावळ ऑनलाईन -लोणावळा शहराचा मध्यवर्ती भाग(Lonavala) असलेल्या जयचंद चौक या ठिकाणी गांजा विकणाऱ्या एका तरुणाला लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी (7 ऑगस्ट) रोजी सापळा लावत ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 2 किलो 70 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
लोणावळा शहरातील अमली पदार्थ विक्री व सेवन याबाबत मागील अनेक दिवसांपासून संताप व्यक्त केला जात होता. आढावा बैठकीत दोन दिवसांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी देखील पोलिसांची काम उघाडणी करत, गावातील सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे गांजा व(Lonavala) अमली पदार्थ कोठे मिळतात व कोण विक्री करतंय मग तुम्हाला का कळत नाही. शहराचे नाव खराब करू नका, आपल्या कर्तव्याचे पालन करा युवा पिढी बरबाद होऊ देऊ नका अशा शब्दात सुनावले होते. त्यानंतर लगेचच दोन दिवसात ही मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे.
Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप
Madhav Patil: विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल पालिका आयुक्तांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करावे — माधव पाटील
लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले, जयचंद चौक याठिकाणी अब्दुल करीम शेख हा तरुण मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती समजल्यानंतर त्याठिकाणी स्थानिक गुन्हे पथकाने सापळा लावत ही कारवाई केली आहे. अब्दुल शेख याच्याकडून 2 किलो 70 ग्रॅम (1 लाख 20 हजार) रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा गांजा त्याने कोठून आणला, कोणाला विक्री करणार होता, आजुन काही साठा त्याच्याकडे आहे का याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस करत आहेत.