Team My Pune City – लोणावळा नगर परिषदेच्या (Lonavala Municipal Council) चतुर्थ श्रेणी कामगारांच्या वारसांची नोकरीत समाविष्ट करण्याची मागील अनेक वर्षांपासून रखडलेली मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. लाड समितीने दिलेल्या शिफारशीनंतर व मागील अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर 23 पैकी 14 वारसांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आले असून त्यांना नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्षा सुरेखा ताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणावळा नगर परिषदेत (Lonavala Municipal Council) सर्व नियुक्त पत्र मिळालेल्या कामगारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व सरकारी नोकरीत समाविष्ट झाले आहात, चांगले काम करा असा सल्ला देखील दिला आहे. तसेच त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
लोणावळा नगरपरिषदेत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करताना काही कामगार सेवा निवृत्त झाले, काही आजारपणामुळे अथवा वेगवेळ्या कारणांमुळे सेवेतून बाहेर (Lonavala Municipal Council) पडल्यानंतर त्यांच्या वारसांना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी मागील एक दशकाहून अधिक काळापासून सुरू होती.
लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी तसेच लोणावळ्यातील लोकप्रतिनिधी असलेल्या सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी याबाबत पहिल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता व वारसांच्या सोबत मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा भेटी देखील दिल्या होत्या.
Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हा विषय मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे आल्यानंतर (Lonavala Municipal Council) त्यांनी देखील मंत्रालयात व विविध शासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने वारसांचा मागील अनेक वर्षांचा संघर्ष व प्रयत्न यांना यश आले आहे. उर्वरित 9 वर्षांचे तांत्रिक बाबींमुळे काम रखडले आहे.
मागील अनेक वर्षांच्या या संघर्षात काही जणांचे वय वाढले असून काही अन्य कारणामुळे नियुक्त झाली नाही. त्यांना किंवा त्यांच्या इतर वारसांना सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सुरेखाताई जाधव व श्रीधर पुजारी यांनी (Lonavala Municipal Council) सांगितले.