मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा पार करत, मावळ तालुक्यातील ओवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत STEM लॅबचे ( STEM Lab )उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हँड इन हँड इंडिया या संस्थेच्या संकल्पनेतून आणि अँटोलीन या कंपनीच्या CSR सहकार्याने ही लॅब उभारण्यात आली आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला अँटोलीन कंपनीचे वरिष्ठ संचालक जोईस सॅम्युअल आणि प्लांट मॅनेजर दत्तात्रय बहिरट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व हँड इन हँड इंडियाचे संदीप मुखर्जी आणि लोकेश गणपथे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
Indrayani Vidya Mandir : विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये हवा मुक्त संवाद – चंद्रकांत शेटे
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या STEM लॅबमधून इयत्ता १ ली ते ७ वीच्या १११ विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी ( STEM Lab )आणि गणित या विषयांचे अनुभवात्मक शिक्षण मिळणार आहे. 3D पेन व 3D प्रिंटरसारख्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे.
मुख्याध्यापक श्री कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात गेल्या ८ वर्षांच्या योगदानाबद्दल संस्थांचे व कंपनीचे आभार व्यक्त केले. “या भागातील पहिली ई-लर्निंग शाळा आणि आता STEM लॅब ओवळे गावात सुरु झाल्याचा अभिमान आहे,” असे त्यांनी ( STEM Lab )सांगितले.
Pimpri-Chinchwad: रेड झोनमधील मालमत्तांना सामान्यकरात 50 टक्के सूट
जोईस सॅम्युअल यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या संधी निर्माण करण्याच्या च्या अँटोलीनच्या उद्देशावर भर दिला. श्री. बहिरट यांनी STEM शिक्षणाचे जागतिक महत्व स्पष्ट करताना सांगितले की, STEM शिक्षण सध्या ११२ देशांमध्ये प्रचलित असून, हे शिक्षण कौशल्यविकासासाठी उपयुक्त आहे.
या लॅबचे उद्घाटन हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या नव्या युगाची नांदी ठरत आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत याच्या यशासाठी सहकार्य ( STEM Lab ) करण्याची ग्वाही दिली.