मावळ ऑनलाईन – मावळातील जांभुळगाव येथे जुन्या भांडण्याच्या कारणावरून(Maval Crime News) दोन गटांमध्ये मारामारी झाली .याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी(दि.3) दुपारी 11 ते 1 या कालावधीत घडली.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
विवेक रामदास काकरे (वय 29 रा.जांभूळ गाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नचिकेत जांभुळकर यशराज जांभुळकर, अनिकेत जांभुळकर, मच्छिंद्र जांभुळकर, दीपक जांभुळकर (Maval Crime News)व दत्तात्रय जांभुळकर या सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक काकरे यांनी दिलेले तक्रारीत म्हटले आहे की, ते दुचाकीवरून घरी जात असताना जुन्या भांडणाचे कारण काढत दमदाटी करत आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली.
तर विवेक काकरे यांच्या विरोधात यशराज आनंदराव जांभुळकर (वय 27 रा. जांभुळगाव) यांनी फिर्यादी असून यामध्ये विवेक काकरे ,शिवम रामदास काकरे, विराज काकरे , सुधांशू या पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जांभुळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काकरे व जांभूळकर यांच्यामध्ये झाड काढण्यावरून जे जुने भांडण झाले होते या कारणावरून काकडे व त्यांच्या साथीदारांनी जांभुळकर यांना मारहाण करत जखमी केले. यावरून वडगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत (Maval Crime News) आहेत.