मावळ ऑनलाईन – मायमर मेडिकल कॉलेज व (Talegaon Dabhade)भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दर्पण महेशगौरी रोटरी सिटीच्या देवदूत पुरस्काराने सन्मानित !
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आयोजित डॉक्टर डे निमित्त देवदूत पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत थाटामाटात मायमर मेडिकल कॉलेजच्या सुश्रुत हॉलमध्ये संपन्न झाला. पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डाॅ. दीपक पुरोहित यांच्या शुभहस्ते मायमर मेडिकल कॉलेज व भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दर्पण महेशगौरी यांना भव्य सन्मानचिन्ह,मानपत्र व महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.
Pasaydaan: १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ‘पसायदान’ पठणाचे आदेश
Bhaje Leni: भाजे लेणीजवळ दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

त्याचबरोबर रोटरी क्लबचे डॉ. गणपत जाधव,डॉ.रोहित आगरवाल,डॉ.मधुरा मिलिंद निकम यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक पुरोहित हे होते.यावेळी रो अध्यक्ष भगवान शिंदे, संस्थापक विलास काळोखे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे,सेक्रेटरी संजय मेहता,क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, हरिश्चंद्र गडसिंगसह रोटरी सिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर आजही लहान बालकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयाच्या सहकार्याने रोटरी सिटीच्या माध्यमातून लहान बालकांसाठी आरोग्य सेवा प्रदान करण्याचा मानस माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक पुरोहित यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त करताना डॉ.दर्पण महेशगौरी यांचे रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत उत्तम कार्य चालले आहे.भविष्यात रोटरी सिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक महा शिबिरे घेऊन काम करावे असे सांगत पुरोहित यांनी रोटरी सिटीच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ.दर्पण महेशगौरी म्हणाले की, रोटरी सिटीचा अत्यंत मानाचा देवदूत पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून मायमर कॉलेज व रुग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. तसेच रोटरी सिटीच्या माध्यमातून मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपण आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून काम करू अशी ग्वाही डॉ. महेशगौरी यांनी या प्रसंगी दिली व रुग्णालयातील सेवाभावी योजनांची व कार्यपद्धतीची माहिती विशद केली.
मावळ तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गोपाळघरे यांनी देवदूत पुरस्काराचे महत्त्व सांगताना रोटरी सिटीच्या विविध अंगी प्रकल्पांचे कौतुक केले.
क्लबच्या माध्यमातून पर्यावरण, शिक्षण, आरोग्य इ.विषयातील उपक्रम भविष्यात राबवले जातील व सेवाभावी कामातून रोटरी सिटीची ओळख करू असे प्रतिपादन अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना रोटरीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.सहप्रांतपाल भालचंद्र लेले, संस्थापक विलास काळोखे, अंबरचे सहसंपादक अतुल पवार,हरिश्चंद्र गडसिंग,सोनबा गोपाळे, श्रीकृष्ण मुळे, यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख रो.डॉ.रोहित आगरवाल यांनी केले.अध्यक्ष भगवान शिंदे, संस्थापक विलास काळोखे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे,सेक्रेटरी संजय मेहता,क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, हरिश्चंद्र गडसिंग इ.सह रोटरी पदाधिकाऱ्यांनी मान्यवर पाहुण्यांचे सत्कार केले.डॉ.दर्पण महेशगौरी यांचा परिचय मेडिकल डायरेक्टर डॉ.गणपत जाधव यांनी दिला तर पीडीजी रो.डॉ.दीपक पुरोहित यांचा परिचय रो. दिपाली पाटील यांनी दिला मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राध्यापक लक्ष्मण शेलार यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी आभार मानले.
संग्राम जगताप, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम, तानाजी मराठे, आनंद रिकामे,संजय वाघमारे, सूर्यकांत म्हाळसकर,निलेश राक्षे, संजय भागवत, संजय चव्हाण, राजेंद्र कडलक, संतोष मोईकर, मिलिंद निकम, दिपाली पाटील, स्वाती मुठे, वैशाली लगाडे, शरयू देवळे, वर्षा खारगे, नीलम रोहिटे,मनीषा पारखे, लक्ष्मण घोजगे, गोपाळ नागरे,रामदास काजळे, रामनाथ कलावडे, राजेश बारणे, पुंडलिक देशमुख, दशरथ पुजारी, दत्तात्रय धुमाळ,दशरथ ढमढेरे,विलास वाघमारे,दलबीरसिंग कोचर,इ.नी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.