मावळ ऑनलाईन – ॲड पु.वा. परांजपे विद्यालयात गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर तालुकास्तरीय आंतरशालेय बौद्धिक स्पर्धा मोठ्या उत्साहात ( P.V. Paranjape School) संपन्न झाली. प्रतिवर्षीप्रमाणे ॲड पु.वा. परांजपे विद्या मंदिरात नू. म. वि. प्र. मंडळाचे संस्थापक सचिव व राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यू कै. गुरुवर्य विष्णू गोविंद तथा अण्णासाहेब विजापूरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मावळ तालुका पातळीवर भव्य स्वरुपात बौद्धिक स्पर्धा शुक्रवार दि. १ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली.
प्रतिवर्षीप्रमाणे तालुक्यातील विविध शाळेमधील विद्यार्थांचा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला.
बौद्धिक स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नू.म.वि.प्र.मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे सर , संदीप पानसरे , राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते .
Pratibha College : विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून अनुभव आत्मसात करावा – डॉ.दीपक शाह
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.पांडुरंग पोटे सर यांनी बौद्धिक स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. स्पर्धेची पार्श्वभूमी व स्पर्धेचे बदललेले स्वरूप याविषयी मनोगत व्यक्त केले. सोनबा गोपाळे सर यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांना गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या कार्याची तसेच शालेय व संस्था उपक्रमांची ओळख करून दिली .
Ajit Foundation: अजित फाऊंडेशनला CSR अंतर्गत किराणा साहित्याची भरीव
तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री ),उपाध्यक्ष गणेश खांडगे ,सचिव संतोष खांडगे ,सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार व खजिनदार राजेश म्हस्के यांनी देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धेत निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा व पद्य पाठांतर स्पर्धा अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन पहिली ते बारावी पर्यंतच्या गटांसाठी केले होते. या स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील एकूण ४५शाळांमधील ४५८ विद्यार्थी सहभागी झाले .बौद्धिक स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख म्हणून दीप्ती बारमुख मॅडम यांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी पैसाफंड प्राथमिक शाळेतील बालवाडी व प्राथमिक विभागातील शिक्षक परीक्षक म्हणून लाभले तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले सर्व शाळांमधील माजी प्राचार्य ,मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , प्राध्यापक ,शिक्षक या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील अध्यापिका दीप्ती बारमुख मॅडम यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी अल्पोपहाराची सोय केलेली होती.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे सर, पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम,सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य ( P.V. Paranjape School) केले.