मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – ९. शके १९४७. वार – शनिवार तारीख – ०२.०८.२०२५ (Rashi Bhavishya 2 August 2025).
शुभाशुभ विचार – विशाखा वर्ज्य.
आज विशेष – आश्लेषा रवी.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०
दिशा शूल – पूर्वेस असेल. आज नक्षत्र – विशाखा.
मेष- (शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 2 August 2025
आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने कार्यक्षेत्रातील आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होऊ शकते.
वृषभ (शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी मेहनत वाढवावी लागेल. आज कोणालाही काही सल्ले न देता फक्त आपला स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य द्या. आज प्रयत्नांती परमेश्वर.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
आज तुमच्यासाठी उत्साह पूर्ण दिवस आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज एखादा नवीन विषय शिकून घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
कर्क ( शुभ रंग- भगवा)
आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुले आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील.
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 2 August 2025
आज मोफत सल्लागार बरेच भेटणार आहेत. ऐकाल जनाचे पण कराल आपल्या मनाचे. प्रवासात काही नाती जुळतील शेजाऱ्यांशी सलोखा वाढणार आहे.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
आर्थिक आवक मुबलक असेल. आज विरोधकही मैत्रीसाठी हात पुढे करतील. आज काही नाती गोड बोलूनच जपावी लागतील. शब्द जपून वापरा.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
आज तुमचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराकडे मनमोकळे करावेसे वाटेल.
वृश्चिक ( शुभ रंग- लाल)
आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येणार आहे. तरुण मंडळी मॉलमधील ब्रँडेड वस्तूंची खरेदी करतील.
Bhosari: दुकानातून ४० लाखांचे साहित्य चोरणाऱ्या मुंबईच्या टोळीला अटक
धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 2 August 2025
आज दिवस लाभाचा असल्याने वाढत्या खर्चातही पैशाची उणीव भासणार नाही. आज आपला मोठेपणा जपण्यासाठी उदार मनाने तुम्ही खर्च कराल.
मकर (शुभ रंग- निळा)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस आहे. नवीन व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात यशाची चढती कमान असेल.
कुंभ ( शुभ रंग- मरून)
शासकीय कामात दिरंगाई होईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना एखादी दिव्य प्रचिती येईल. श्रद्धाळू गृहिणींचा यथाशक्ती दानधर्म चालूच राहील. सामान्य दिवस.
मीन ( शुभ रंग – गुलाबी)
व्यवसायात मर्यादेबाहेर आर्थिक उलाढाली आज टाळा. यंत्रावर कामे करणाऱ्यांनी आज आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. पत्नीचे सल्ले डावलू नका.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424