मावळ ऑनलाईन – तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी वाहन चोरी (Talegaon)करणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख १५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोहेल नवाज खान (२०, रा. महांळुगे, ता. खेड. मूळ रा. कर्नाटक), संतोष अशोक अहिवळे (१९, रा. महाळुंगे, ता. खेड. सोलापूर), सुमीत संतोष शिंगारे (१९, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. लातुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विनोद धनराज मेघावत (२४, पाषाण, पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद यांची दुचाकी १९ जुलै रोजी मावळ तालुक्यातील बदलवाडी येथील एका कंपनीच्या पार्किंग मधून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन पथके तयार केली.
Lonavala : लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यावरण व नागरी सुविधावर आधारित विकास आराखडा तयार करावा – उच्च न्यायालय
Ajit Pawar: राज्य शासन एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे- उपमुख्यमंत्री अजित पवार
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये घटनास्थळी काही तरुण सतत ये जा करत असल्याचे दिसले. त्यानुसार त्यांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तीन दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीनही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.