मावळ ऑनलाईन – वडगाव शहरातील तरुणाईमध्ये दिवसेंदिवस ( Vadgaon Maval News) वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे असून हे सर्व अवैध धंदे पोलिसांनी तातडीने बंद करावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन वडगाव शहर भाजपाने आज पोलिस निरीक्षक यांना दिले.
वडगाव शहर ही तालुक्याची प्रशासकिय राजधानी आहे तसेच येथे शाळा व वरीष्ठ महाविद्यालय असल्याने येथे युवा वर्ग व तालुक्यातील नागरीकांची कायमच वर्दळ असते.शहराची ( Vadgaon Maval News) ओळख सांस्कृतिक केंद्र व क्रीडापंढरी म्हणून देखील आहे आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले श्री पोटोबा महाराज देवस्थान गावात आहे.गावची ओळख व नावलौकिक वेगळ्या स्वरूपाचा आहे.परंतु मागील काही दिवसांत वडगावची ही ओळख पुसट होऊन अवैध धंदे व व्यसनाधीनतेचे शहर म्हणून होऊ पाहत आहे.भविष्यातील वाढत्या गुन्हेगारीचा हा पाया आहे.म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करून शहरातील अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, याकामी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.
Ganesh Festival : गणेशोत्सवावरील वेळेची बंधने शिथिल होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडू – अजित पवार
यावेळी भाजप शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर,श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांच्यासह माजी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, अमोल पगडे,भाजयुमोचे अध्यक्ष आतिश ढोरे, मकरंद बवरे,शरद मोरे, कल्पेश भोंडवे,विकी म्हाळसकर, नितीन ओव्हाळ,भोलेनाथ म्हाळसकर,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित ( Vadgaon Maval News) होते.