मावळ ऑनलाईन – लोणावळा-खंडाळा या पर्यटनदृष्ट्या ( Lonavala) महत्त्वाच्या भागातील अनियंत्रित विकास आणि अपुऱ्या नागरी सुविधांवर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने ठोस निर्णय दिला आहे. ‘लोणावळा-खंडाळा सिटीझन फोरम’सह इतरांनी दाखल केलेल्या विविध जनहित याचिकांवर निर्णय देताना मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने पर्यावरण आणि नागरी विकास यामधील समतोल राखण्यावर भर दिला.
Missing : नवलाख उंबरे येथील महिला एक महिन्यापासून बेपत्ता
खंडपीठाने स्पष्टपणे नमूद केले की, “थंड हवामान असलेल्या( Lonavala) पर्यटन स्थळांमध्ये पर्यावरणीय संतुलन राखले गेले पाहिजे. जर लोणावळा-खंडाळा परिसराचे पर्यावरण रक्षण केले नाही, तर या भागातील आकर्षणच नष्ट होईल.” हे निरीक्षण न्यायालयाने एका 2007 साली दाखल झालेल्या याचिकेच्या संदर्भात नोंदवले, ज्यामध्ये स्थानिक रहिवाशांची दयनीय स्थिती, नागरी सुविधा आणि बेकायदा बांधकामांच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधण्यात आले होते.
न्यायालयाने पुढील महत्त्वाचे निर्देश दिले:
लोणावळा नगर परिषदेला आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश
27 ऑक्टोबर 2016 च्या आदेशानुसार स्थापन करण्यात ( Lonavala) आलेल्या तक्रार निवारण यंत्रणेवर आलेल्या तक्रारींची कार्यवाही तातडीने करणे
नगरपरिषदेला तक्रार निवारण यंत्रणेची जनजागृतीसाठी जाहिरात करणे
राज्य सरकारने लोणावळा-खंडाळ्यासारख्या थंड हवेच्या भागांसाठी नवीन विकास नियंत्रण नियमावली तयार करणे
Ganesh Festival : गणेशोत्सवावरील वेळेची बंधने शिथिल होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडू – अजित पवार
नवीन विकास आराखडा तयार होईपर्यंत 2014 मध्ये गठित तज्ज्ञ समिती कार्यरत राहणार, आराखडा अंतिम झाल्यावरच ती बरखास्त होणार
विशेष बाब म्हणजे, खंडपीठाने राज्य सरकारला लोणावळा व खंडाळा ( Lonavala) यांना अधिकृत ‘हिल स्टेशन’ दर्जा देण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे या भागासाठी स्वतंत्र आणि कठोर नियमनाचे धोरण आखणे शक्य होईल. याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारकडे ही मागणी अधिकृतपणे करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या निर्णयामुळे लोणावळा-खंडाळा परिसरातील पर्यावरण रक्षण, अनियंत्रित बांधकामांवर आळा आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये या आदेशामुळे दिलास्याचे वातावरण ( Lonavala) आहे.