मावळ ऑनलाईन – बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना एका विद्यार्थ्याला अडवून बेदम मारहाण केल्याची (Talegaon Dabhade Crime News) घटना मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Talegaon Dabhade Crime News : तळेगाव दाभाडे येथे जादूटोणा केल्याचा प्रकार उघड
आशिष अभिमान सुरवसे (२५, पवार वस्ती, दापोडी), राहुल मिलींद सूर्यवंशी (२४, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिक्या आणि अन्य एकाच्या Talegaon Dabhade Crime News) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
PCU : पीसीयूच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संधी – कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी ‘मला मारू नका, मला सोडा’ अशी विनंती करत असताना, त्यांच्यासोबत असलेल्या राहुल नावाच्या व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात, छातीत, नाकावर आणि तोंडावर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी आशिष सुरवसे याने लाथा-बुक्क्यांनी छातीत आणि पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.