मावळ ऑनलाईन – राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील पोल्ट्री शेडचे( Poultryshed ) नोंदणी अभियान वेगाने सुरू असून आत्तापर्यंत ४५० पोल्ट्री शेडच्या नोंदी पूर्ण झाल्या असल्याचे मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी सांगितले.
Talegaon Dabhade : श्री विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन भक्तीभावाने साजरा
राज्य शासनाने पोल्ट्री व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलेला असून राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या नोंदणी अभियानानुसार मावळ तालुक्यात पोल्ट्री शेडचे नोंदणी अभियान मावळ तालुका पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ अनिल परांडवाल आणि डॉ दीपक राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सुरू आहे.
मावळ तालुक्यात सुमारे वीस वर्षांपूर्वीपासून शेतीला जोडधंदा म्हणून सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्थसहाय्यावर मावळ तालुक्यात या व्यवसायाला सुरुवात केली. हा व्यवसाय सध्या मावळ तालुक्यामध्ये शेतीनंतर एक पूरक व्यवसाय म्हणून समजला( Poultryshed ) जातो.
Republican Sena : रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पानपाटील यांची नियुक्ती
मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या मावळ पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, सचिव प्रवीण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बथाले यांच्या आवाहानानुसार शेतकऱ्यांनी आपापल्या ( Poultryshed ) शेडच्या नोंदणी अभियानात सहभाग नोंदवलेला आहे.
मावळ तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत हे अभियान सध्या सुरू असून गाव पातळीवर असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत ही नोंदणी केली जात आहे. पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या पोल्ट्रीची नोंद करून घ्यावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ अनिल परांडवाल व डॉ दीपक राक्षे यांनी ( Poultryshed ) केले आहे.