मावळ ऑनलाईन – मावळातील वडेश्वर येथील (Maval)टाटा बॅक वॉटर परिसरात मंगळवारी (दि. 29 जुलै) सायंकाळच्या सुमारास एका 34 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत इसमा जवळ मिळालेल्या आधार कार्ड वरून इश्लोक कुमार सुरेश यादव (वय 34 रा. गिलानी, नालंदा, बिहार) अशी ओळख पटली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सदर इसम टाटा बॅक वॉटरच्या भिंतीच्या आतमध्ये काही कारणास्तव गेला होता. यावेळी तो पाण्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी ही घटना लक्षात येताच पोलीस प्रशासन व आपत्कालीन यंत्रणेला माहिती दिली. घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. काही वेळाने या इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
Jambhulwadi:जांभूळवाडी येथे वाहनाच्या धडकेत लोखंडी हाईटगेज तुटले, मोठ्या वाहनाना बंदी
K-Villa Housing Society : ‘के व्हिला’ समोरील कचरा प्रकल्प हटाव बाबत नागरिकांचा मोठा रोष – अॅड. आशिष देशपांडे

घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. मृत इसमाच्या ओळखीबाबतची अधिकृत नोंद करण्यात आली असून त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेचा तपास वडगाव मावळ पोलीस करत असून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सदर मृत इसमाबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ वडगाव मावळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.