मावळ ऑनलाईन – हॉस्पिटले ही केवळ उपचारासाठीच नसून त्यांनी रोगप्रतिबंधक उपाययोजनांवर देखील ( Pavana Medical Foundation) काम केले पाहिजे. त्यासाठी पवना मेडिकल फाउंडेशन समाजातील विद्यार्थी,शिक्षक, पोलीस,पत्रकार यांच्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्ष काम करीत आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील डॉक्टरांना समजून घेत सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे असे आवाहन पवना मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ वर्षा वाढोकर यांनी येथे केले.


पवना मेडिकल फाउंडेशन आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रोग प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पवना हॉस्पिटल येथे मंगळवार (दि २९) करण्यात आले होते. त्यावेळी डॉ वर्षा वाढोकर बोलत होत्या.

Pimpri chichwad Crime News 30July 2025 : बँक अधिकाऱ्यांकडून ४३ लाखांची फसवणूक
शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ सत्यजित वाढोकर आणि डॉ वर्षा वाढोकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ प्रतिक वाढोकर,संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे,उपाध्यक्ष अमिन खान, सल्लागार सोनबा गोपाळे,बी एम भसे,प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, ज्ञानेश्वर वाघमारे, रमेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ वर्षा वाढोकर पवना मेडिकल फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमची माहिती देत पुढे म्हणाल्या नजीकच्या काळात सिटीआर (हार्ट अटॅक प्रसंगी) एखाद्याला करावयाच्या तातडीच्या प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण सर्व पत्रकारांना देण्यात येणार असल्याचे त्याप्रसंगी डॉ वर्षा वाढोकर ( Pavana Medical Foundation) यांनी सांगितले.
Maval: टाटा बॅक वॉटर मध्ये बुडून 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
याप्रसंगी मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या आरोग्याच्या विविध चाचण्या आणि तपासणी करण्यात आली. पत्रकार संघातर्फे या मोफत शिबिरासाठी डॉ वाढोकर उभयतांचा सत्कार तसेच डॉ प्रतीक वाढोकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आणि आयोजनाबद्दल प्रशासन अधिकारी फरीदा बेग,डॉ मंधुली बागवे,डॉ स्नेहा उमाडे, सुनील निकम,शितल पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ प्रतीक वाढोकर यांनी अमेरिकेत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ञांच्या परिषदेची माहिती दिली. ए आय तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रांतही झपाट्याने येत असून पवना हॉस्पिटलमध्ये याबाबतची आधुनिक उपकरणे आणि यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे अशी माहिती त्यांनी याप्रसंगी त्यांनी दिली.यावेळी सोनबा गोपाळे गुरुजी यांनी पत्रकारांचे आरोग्य व आरोग्य शिबिराची गरज याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी केले. प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे यांनी सूत्रसंचालन केले. आभार संघाचे उपाध्यक्ष अमिन खान यांनी ( Pavana Medical Foundation) मानले.