महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा पुणे आणि (Talegaon Dabhade) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कै.डॉ. जयंत नारळीकर विज्ञान लेखन पुरस्कार नुकताच फिरोदिया हॉल शिवाजीनगर येथे पार पडला.
महाराष्ट्राचे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. दीपक शिकारपुर (विज्ञान आणि शास्त्रज्ञ), डॉ. अविनाश भोंडवे (आरोग्यशास्त्र), डॉ. विनिता आपटे (पर्यावरणशास्त्र), डॉ. के.सी. मोहिते (भौतिकशास्त्र) यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Shirgaon Crime News : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा
नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर जी. डी. यादव यांच्या हस्ते डॉ. दीपक शिकारपूर यांना जयंत नारळीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या ६३ व्या पुस्तकाचे प्रकाशन ही संपन्न झाले. अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन ह्या मार्गाने ते उद्याची सक्षम व कौशल्यपूर्ण युवापिढी घडवत आहे. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हावे यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत.
मराठी विज्ञान परिषदेचे डॉ. राजेंद्र कुमार सराफ, डॉ. मिलिंद जोशी, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक जोशी, एनएमआयटी चे प्राचार्य डॉ. एस.एन.सपली यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार संस्थेचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश मस्के, पीसीइटी व नूतन ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एनएमआयईटी चे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार व इतर मान्यवरांनी या पुरस्कार सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारणी सभेचे अध्यक्ष मा. सचिन इटकर होते.
सोहळा मुख्य समन्वयक म्हणून डॉ. मिलिंद ओव्हाळ,प्रा.सत्यजीत शिरसाट, प्रा.अभिजीत ऐवळे, डॉ. शाहूराज साबळे,जयदीप भालेकर यांनी जबाबदारी पार पाडली. आभार प्रदर्शन नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. सपली यांनी केले.