situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bala Bhegde: भाजप महायुती म्हणूनच मावळात निवडणुका लढवणार; सुनील शेळके यांनी भाजप उमेदवाराचे नाव का घेतले? – बाळा भेगडे यांचा सूचक टोला

Published On:

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात आगामी (Bala Bhegde)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी सत्तारूढ महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याची अधिकृत माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांना नाव न घेता सोज्वळ पण सूचक शब्दांत चिमटा घेतला.

भेगडे म्हणाले, “महायुतीतील घटक पक्षांनी आपापल्या पक्षातील इच्छुकांचीच नावे जाहीर करावीत. इतर पक्षांच्या उमेदवारांबाबत भाष्य करणे उचित नाही. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपच्या माजी नगरसेवक संतोष दाभाडे यांचे नाव तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपदासाठी घोषित केले. ही भूमिका त्यांच्या पक्षाच्या (राष्ट्रवादी – अजित पवार गट) दृष्टीने योग्य असेलही, पण भाजपच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासारखी आहे.”



Shirgaon Crime News : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा

यावेळी भेगडे यांनी सुनील शेळके यांच्यावर सूचक भाषेत टीका करत सांगितले की, “कदाचित त्यांच्या पक्षाकडे तळेगावसाठी प्रभावी नगराध्यक्षपदाचा उमेदवार नसेल, म्हणूनच त्यांनी भाजपचे नाव पुढे आणले असावे.”

महायुतीची भूमिका स्पष्ट

भेगडे पुढे म्हणाले की, राज्यात जशा महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार आहेत, त्याच धर्तीवर मावळ तालुक्यातही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन मैत्रीपूर्ण वाटाघाटी करून जागावाटप करतील. ज्या ठिकाणी सहमती होणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील.

“महायुती तळेगावपुरती मर्यादित नाही. ती संपूर्ण तालुक्याच्या पातळीवर राहणार आहे. एकीकडे युती करायची आणि दुसरीकडे स्वपक्षात नसलेल्या उमेदवारांचे नावे जाहीर करायची, ही भूमिका महायुतीच्या धोरणाच्या विरोधात आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भाजपचे स्पष्ट धोरण

भेगडे यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि निवडणूक धोरण आधीच निश्चित केले आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण ७३ जिल्हा परिषद गट व १४३ पंचायत समिती गण आहेत. त्या प्रमाणात नियोजन आणि आघाडीची आखणी केली जात आहे.

पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, तळेगाव-इंदोरी गणाचे अध्यक्ष चिराग खांडगे, श्री क्षेत्र देहू-देहुरोड मंडल अध्यक्ष रघुवीर शेलार, भाजपचे माजी नगरसेवक सचिन टकले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ही बैठक आणि भेगडे यांची स्पष्ट भूमिका पाहता, मावळमध्ये महायुतीच्या अंतर्गत समन्वय आणि निर्णय प्रक्रियेवर भाजपचा ठसा दिसून येत आहे. मात्र, घटक पक्षांतील अंतर्गत स्पर्धा आणि भूमिकांमुळे युतीतील मतभेद लपवले जात नसल्याचेही या वक्तव्यातून सूचित झाले आहे.

Follow Us On