मावळ ऑनलाईन – व्यसनापासून तरुणाईने दूर राहावे (Milind Bhoi)असे मनोगत राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई यांनी अमली पदार्थ आणि तरुणाई या विषयावरील व्याख्याना प्रसंगी केले.
आजची तरुण पिढी ही व्यसनाकडे आकर्षित होत असून त्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन सुजाण नागरिक बनावे व भारताची युवा पिढी व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे असेही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळ भूषण माजी आमदार आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिराचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे,राज्य पुरातत्त्व विभागाचे तांत्रिक अधिकारी हेमंत गोसावी भोई प्रतिष्ठानचे प्रमोद परदेशी प्रभाकर वाघ कु दीक्षा दोसगडे,गोल्डन रोटरीचे रो बसप्पा भंडारी,डॉ रो सौरभ मेहता,रो कविता खोल्लम,रो रितेश फाकटकर, रो डॉ सचिन भसे हे उपस्थित होते.
तळेगाव शहरातील युवा पिढीने तळेगाव शहरात आदर्श निर्माण करावा व व्यसनमुक्त राहावे असे उद्गार गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी केले.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद
Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा


त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंद्रायणी विद्या मंदिराचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त देश घडविण्याची शपथ देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो दिनेश चिखले, रो राकेश गरुड, रो दिलीप पंडित,रो सुरेश भाऊबंदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख विजय गोपाळे यांनी सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी केले.