मावळ ऑनलाईन -मावळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने(Maval) मुसळधार पाऊस सुरू आहे. पवना नदीवरील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला. यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेतील संपर्क तुटला आहे. यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण शनिवारी 86 टक्के भरले. धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत असून धरणातून शनिवारी सकाळी 11 वाजता 7140 किंवा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. पवना नदीची पाणी पातळी वाढल्याने कोथुर्णे जवळील पूल आणि काले येथील स्वयंभू मंदिर पाण्याखाली गेले आहे. यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. या ग्रामस्थांना शिवली, ब्राह्मणोली अथवा कडधे मार्गे पवनानगर आणि कामशेत कडे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन
दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.