मावळ ऑनलाईन – लोणावळा शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने ( Lonavala Rain) जोर धरला असून, गेल्या 24 तासांत तब्बल 172 मिमी (6.77 इंच) पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. रात्री काहीसा खंड पडल्याने थोडी विश्रांती मिळाली, मात्र शनिवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
Pavana Dam : पवना धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता, पाणीसाठा 86 टक्क्यांवर
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावरील भागात आजही (शनिवार) जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहर व मावळ परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या वर्षी आजपर्यंत लोणावळ्यात 3480 मिमी (137.01 इंच) पावसाची ( Lonavala Rain) नोंद झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत (321 मिमी / 126.38 इंच) अधिक आहे.
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन
पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत, तसेच डोंगरमाथ्यावरून ( Lonavala Rain) वाहणारे धबधबे सुद्धा प्रचंड वेगाने वाहत आहेत. यामुळे संकटग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शनिवार-रविवार हे पर्यटकांच्या गर्दीचे दिवस असतात. त्यामुळे लोणावळा व परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धबधब्याखाली जाण्याचा प्रयत्न करणे, निसर्गाचे सौंदर्य पाहण्याच्या नादात जीव धोक्यात घालणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्टपणे ( Lonavala Rain) सांगितले आहे.