मावळ ऑनलाईन – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील( Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ डोंगरावरील माती आणि झाडाझुडपं रस्त्यावर आल्यानं शनिवारी सायंकाळी मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ही घटना शुक्रवारी (दि.25) संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडली असून, मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन तात्पुरती बंद करण्यात आली होती.
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन
या भागात गुरुवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच, खंडाळा-लोणावळा व रायगड जिल्हा परिसरातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा मारा झाल्याने, डोंगर उतारावरील माती आणि काही झाडे वाहून थेट महामार्गावर आली. यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
Rashi Bhavishya 26 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस आणि आयआरबी (IRB Infrastructure) चे आपत्कालीन कर्मचारी तातडीने घटनास्थळी( Mumbai-Pune Expressway) पोहोचले. त्यांनी जेसीबी आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली माती व झाडे झुडपे हटवण्याचे काम तत्काळ सुरू केले. सुमारे साडेसात वाजेपर्यंत रस्त्यावरून माती हटवण्यात यश आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या प्रकारात सुदैवाने मोठे दगड किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनचालकांनी या भागात अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन पोलिस व महामार्ग प्रशासनाकडून करण्यात आले ( Mumbai-Pune Expressway) आहे.