मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – २. शके १९४७. वार – शनिवार. तारीख – २६.०७.२०२५.(Rashi Bhavishya 26 July 2025)
शुभाशुभ विचार – व्यतिपात वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – आश्लेषा १५.५२ पर्यंत नंतर मघा. चंद्र राशी – कर्क. १५.५२ नंतर सिंह.
मेष- (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 26 July 2025
पारिवारिक सदस्यात एकजूट राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल. किमती वस्तूंची खरेदी होईल. छान दिवस.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.
मिथुन (शुभ रंग – मोतिया)
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुमचे मनोबलही उत्तम असेल. आज दुपारनंतर काही प्रश्न सोडवावे लागतील.
कर्क ( शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. आज घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय घ्याल.
Fraud : लग्नाच्या आमिषाने महिलेची ११.८१ लाखांची फसवणूक
सिंह ( शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 26 July 2025
राशीच्या व्ययस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना जमा खर्चाचे अंदाज चुकतील. असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित लाभ होऊ शकतो.
कन्या (शुभ रंग- लाल)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टिक्षेपात येईल. आप्तस्वकीयात तुमचा मान सन्मान वाढेल.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
मोठ्या लोकांमधील असलेल्या तुमच्या ओळखी तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज तुम्ही फक्त आपला स्वार्थ साधून घेणार आहात.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
ज्येष्ठ मंडळींचा देवधर्माकडे कल वाढेल. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. आजी आजोबांनी आज फक्त सत्संगात रमणेच हिताचे राहील.
Chinchwad: चिंचवड येथील द्वारयात्रेला प्रारंभ
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 26 July 2025
आज काम कमी आणि दगदग जास्त होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. प्रलोभाने टाळा.
मकर (शुभ रंग- निळा)
आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
आज सर्वात आधी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. काही जुने आजार डोके वर काढू शकतील. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा.
मीन ( शुभ रंग – सोनेरी)
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. नोकरदारांना अधिक पगाराच्या नव्या संधी चालून येतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424